श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर

नीरा-भीमा संगमाचा परिसर एकेकाळी अतिशय निसर्गरम्य होता. ऋषी, साधू, तपस्वी व योगी यांच्या निवासाचे हे स्थान होते. कारण श्रीनृसिंहाचे चिरस्थायी वास्तव्य या ठिकाणीच होते. भक्त प्रल्हाद अनन्साधारण भक्तिभावाने नृसिंहांच ‘वालुकामय मूर्तीची’ पूजा करत असे, हीच वाळूची नृसिंहाची मूर्ती आज या ठिकाणी गाभार्यात दृष्टीस पडते.
शेकडो वर्षाचा काळ पुढे जात होता. अनेक जाती-धर्माचे,विविध पंथांचे राजे-सरदार आपल्या कर्तृत्वाच्या खुणा ठेवून काळाच्या पडद्याआड जात होते. चैत्र शु।।१ शके १६७८ रोजी विठ्ठल शिवदेव सरदार विंचूरकरांनी नृसिंह मंदिर उभारणीस प्रारंभ केला. दोन्ही नद्यांच्या पाण्यात, टेकडीलगत मोठ-मोठय़ा दगडी शिळा आणि शिसे ओतून भव्य असा चबुतरा तयार केला. यावरती भक्कम असा अंडाकृती घाट बांधण्यात आला व त्याच्यावर भक्कम असा बुरूज बांधण्यात आला आणि नंतर भव्य अशा मंदिराची उभारणी करण्यात आली. या वरती उंच शिखर बांधण्यात आले. नृसिंह गाभार्याच्या उजव्या बाजूस लक्ष्मी मंदिर दिसून येते. काही सभामंडप, विस्तीर्ण ओवऱ्या आणि भव्य अशी पूर्व व पश्चिम दिशांना प्रवेशद्वारे बांधण्यात आली. नदी पात्रापासून मंदिराची उंची ९० फूट आहे व हे मंदिर उभारणीस त्या काळात सात लाख रुपये खर्च आला व 20 वर्षात बांधकाम पूर्ण झाले. पुढे रामदास, तुकाराम, नामदेव व इतर संतांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य करून याची महती अभंग व श्लोकाद्वारे सर्वत्र पसरवली.तसेच अनेक राज्ये, प्रधान व सरदारांनी देवस्थानास मोठय़ा देणग्या दिल्या व याचे वैभव वाढवले.
Read More

Events

काकड

पहाटे पाच वाजता सूर्योदयापूर्वी पूजाधिकारी देवालयाची द्वारे उघडून श्रीनृसिंहासह सर्व परिवार देवतांना काकड्याणने ओवाळतात. यावेळी श्रींस खिचडीचा नैवैद्य दाखविला जातो.

काकड

पहाटे पाच वाजता सूर्योदयापूर्वी पूजाधिकारी देवालयाची द्वारे उघडून श्रीनृसिंहासह सर्व परिवार देवतांना काकड्याणने ओवाळतात.

नित्य पूजा विधी व उपचार

काकड

पहाटे पाच वाजता सूर्योदयापूर्वी पूजाधिकारी देवालयाची द्वारे उघडून श्रीनृसिंहासह सर्व परिवार देवतांना काकड्याणने ओवाळतात. यावेळी श्रींस खिचडीचा नैवैद्य दाखविला जातो.

प्रातःपूजा

सकाळी ७ वाजता पहिल्या प्रहरात हि पूजा पूर्ण होते. श्रीनृसिंह व श्रीशामराज या दोन्ही मूर्तीस पंचामृत स्नान घालून षोडशोपचार पूजा होते. नृसिंहपूर प्रथेनुसार ऋग्वेदीय व सामवेदीय सुक्तांनी तसेच पौराणिक मंत्रांनी पूजा केली जाते. नंतर श्री मूर्तीस पोशाख परिधान केला जातो. धूप दीपाने आरती होऊन श्रीस पायसाचा नैवैद्य दाखविला जातो. नंतर परिवार देवतांची पूजा केली जातो.

माध्यान्हपूजा

दुपारी १२ वाजता श्रींस पुरणपोळीचा महानैवैद्य दाखविला जातो व महाआरती केली जाते.

सायंपूजा

सायंकाळी ७ वाजता श्रींस पंचोपचारे मंत्रस्नान घालून धूप दीप नैवैद्य युक्त पूजा केली जाते. या वेळी नगारखाण्यातील नगारा नौबत, झांज, घाटी वाजवली जाते.

शेजारती

रात्रौ ९ वाजता श्रींची शेजारती केली जाते. शेजारती नंतर चंपुप्रार्थना म्हणण्यात येऊन श्रींस दुधाचा नैवैद्य दाखविण्यात येतो. त्यावेळी श्रींपुढील चांदीचे दांडीपासून शेजघरापर्यंत पायघडी अंथरतात. या सर्व विधी नंतर श्री नृसिंहाची क्षमा मागून पूजाधिकारी द्वारे बंद करतात.